पुण्यातील गँगवॉरमध्ये आता रक्ताचा हिशोब फक्त टोळ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो घराघरात, नात्यात पोचलाय. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बदल्यात, त्यांच्या हत्येचा मारेकरी गणेश कोमकराच्या मुलाचा म्हणजेच आयुष कोमकरचा खून झाला. पण या घटनेला आणखी एक हृदय पिळवटून टाकणारा पैलू आहे.. आयुषचा मारेकरी त्याचा आजोबाच निघालाय.. पाहुयात या रक्तरंजित बदल्याचा रिपोर्ट..