हत्या खंडणी प्रकरणांवरून बीड जिल्हा सध्या राज्यात सर्वाधिक चर्चेत आहे, अशात आज बीडमधील जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत बीडमधील चुकीच्या कामांची चौकशी होणार असल्याचे निर्देश अजित पवारांनी दिलेत.तर अतिरिक्त कामं कशी मंजुर केली असा सवालही त्यांनी केलाय. विशेष म्हणजे धनंजय मुंडे शेजारी उभे असतानाच अजितदादांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिलाय.. मात्र हा दम नेमका कार्यकर्त्यांसाठी होता की धनुभाऊंसाठी याबाबत चर्चा रंगलीय.. अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कोणत्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिलाय पाहुया.