प्रयागराजमधल्या महाकुंभातल्या चेंगराचेंगरीनंतर सरकारला जाग आलीय.प्रयागराजमधल्या महाकुंभातल्या चेंगराचेंगरीनंतर सरकारला जाग आलीय.योगी सरकारनं या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेत.तसंच अशा दुर्घटना टाळण्यासाठी काही नवे नियम करण्यात आलेत. महाकुंभातले व्हीआयपी पास बंद करण्यात आलेत.एकीकडे सामान्य भाविकांची गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरीची घटना झाली, तर दुसरीकडे व्हीआयपींसाठी आरक्षित असलेल्या घाटांवर गर्दी नसल्याचं लक्षात आलं.अनेकांनी व्हीआयपी घाटांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत, हा भेदभाव का, असा प्रश्न विचारला. त्यानंतर व्हीआयपी पास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर वाहुतकीच्या नियमांमध्येही बदल करण्यात आलाय