देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मुलाखत दिली होती.त्या मुलाखतीत फडणवीसांनी दोन महत्त्वाची विधानं केली होती एक होतं.नेव्हर से नेव्हर म्हणजे राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असा त्याचा अर्थ होता आणि फडणवीसांचं दुसरं विधान होतं उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत.आता विधानसभा निवडणुकीपूर्वीचा काळ जरा आठवून पाहा.निवडणुकीच्या प्रचारात ठाकरेंनी फडणवीसांवर प्रचंड टीका केली होती.मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जादूची कांडी फिरल्यासारखे अचानक ठाकरे आणि भाजपमध्ये मैत्रीचे वारे वाहू लागलेत.अशा वेळी एका लग्नात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील भेटले.अर्थात लग्नात काही युतीच्या चर्चा होत नाहीत पण या भेटीत युतीचा विषय ठाकरेंच्या नेत्यांनीच काढला. पाहुया नेमकं काय घडलंय....