ट्रम्प प्रशासनाला नऊ दिवस उलटून गेलेत. या नऊ दिवसांमध्ये ट्रम्प यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे कामांचा धडाका दिसतोय. एक महत्त्वाचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला तो म्हणजे अविकसित देशांना अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीला तात्पुरती स्थगिती. ट्रम्प सरकारनं हा निर्णय घेताना बायडन सरकारवर मोठा आरोप केलाय. बायडन सरकारनं गाझामध्ये कंडोम वितरणासाठी निधी मंजूर केला मात्र या मदतीतून हमासनं कंडोमचा शस्त्रांसाठी वापर केला असा दावा करण्यात येतोय. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण