बुरखा घालण्याच्या मुद्द्यावरून सध्या प्रचंड वादावादी सुरू आहे.याची सुरूवात झाली ती भाजप आमदार नितेश राणेंनी केलेल्या एका वक्तव्याने परीक्षेला जाणाऱ्या मुलींनी परीक्षाकेंद्रात बुरखा घालून प्रवेश करू नये अशी नितेश राणेंची मागणी आहे.शालेय शिक्षण विभागाने याबाबतीत कोणताही निर्णय घेतलेला नाही मात्र विरोधकांना या मागणीला विरोध केलाय.धर्माचा मुद्दा बाजूला ठेवून फक्त परीक्षा पद्धती आणि त्यातील संभाव्य गैरप्रकार इतक्याच अर्थाने जर या मागणीकडे पाहिलं तर यावर गांभीर्याने चर्चा व्हायला हवी का असा मुद्दा उपस्थित होतोय.पाहुयात याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट.