भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांची ऑडिओ क्लिप NDTVच्या हाती लागलीय, भाजप आमदार सुरेश धस यांनी बुधवारी भास्कर केंद्रे यांचे 100 डंपर आणि 15 जेसीबी असल्याचा आरोप केला होता, भास्कर केंद्रे हे परळी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, पोलीस असूनही 100 डंपर कसे असा सवालही सुरेश धस यांनी उपस्थित केला होता, दरम्यान भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्तेंच्या ऑडिओ क्लिपची NDTV पुष्टी करत नाही.