Akola| कीटकनाशक फवारणी ठरतेय जीवघेणी, GMC रुग्णालयात विषबाधेमुळे 22 जण उपचाराधीन

अकोला जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांवर सुरू असलेल्या फवारणीदरम्यान योग्य सुरक्षा उपाय न घेतल्याने विषबाधेच्या घटना वाढत आहेत. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात सध्या तब्बल २२ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे. तज्ज्ञांनी मास्क, हातमोजे, गॉगल आणि योग्य कपड्यांचा वापर करण्याचं आवाहन केलं असलं तरी विषबाधेच्या घटना थांबत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणीही आता पुढे येत आहे.

संबंधित व्हिडीओ