शिवसेना खासदार संदीपान भूमरे यांचे चिरंजीव आणि आमदार विलास भूमरे यांच्या ड्रायव्हरला मिळालेल्या सुमारे १५० कोटी रुपयांच्या जमीन प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विलास भूमरे यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे.