वरळी कोळीवाडा येथे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्या दरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते सिद्धार्थ शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.