ऑक्टोंबरमध्ये अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा मिळणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडेय यांनी ही माहिती दिलीय.अमरावती विमानतळ विदर्भातील अर्थव्यवस्था, व्यापाऱ्याला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारय. 16 एप्रिलला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे लोकार्पण होणारय.