भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी पण हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पापांचं काय? | Operation Sindoor| NDTV

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी पाकिस्ताननं भारतावर गेले तीन रात्र ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू ठेवले होते. सीमा भागात विशेषतः जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्ताननं गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू ठेवला होता. त्यामुळे सीमावर्ती भागात सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक घरांचं प्रचंड नुकसान झालं. पाकिस्तानच्या या हल्ल्यात काही लहानग्यांचा झालेला मृत्यू हा सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारा होता. राजोरीमध्ये एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. शस्त्रसंध नंतर आता सीमेवरचा तणाव निवळेल आणि सीमावर्ती भागात पुन्हा शांतता प्रस्थापित होईलही. पण या सगळ्यामध्ये आपल्यातून निघून गेलेले हे लाख मोलाचे जीव परत येणार नाहीत हे दुःख मात्र कायम असेल.

संबंधित व्हिडीओ