पहलगाममध्ये भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख उत्तर दिलं. हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर भारतानं पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. भारतानं हल्ला केलेली ठिकाणं ही दहशतवादी तळ नव्हते असा दावा पाकिस्तान वारंवार करत होता. पण पाकिस्ताननं केलेले हे सगळे दावे किती फोल आहेत हे फक्त तीस दिवसांमध्ये स्पष्ट झालं.