ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना भिवंडीमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. नारपोली ते धामणकर नाका दरम्यान मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी एक लोखंडी सळई अचानक कोसळली. ही सळई रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.