तेल भरतानाच UAEच्या बंदरावर हल्ला; 80 हजार टन तेलासह 'जग लाडकी' रवाना, क्रूड ऑईल घेऊन टँकर निघाला

भारतासाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी.कारण तिसरं भारतीय जहाज तेलासह रवाना झालंय. जग लाडकी हे जहाज 80 हजार 800 टन कच्चं तेल म्हणजे क्रूड ऑईल घेऊन भारताकडे रवाना झालंय.. विशेष म्हणजे हे जहाज हल्ल्यातून वाचलंय. रविवारी फुजैरा बंदरावर इराणने जोरदार मिसाईल हल्ला चढवला. तेव्हा जग लाडकी हे जहाज तेल भरत होतं. मात्र ते थोडक्यात बचावलं. या जहाजावरचे सर्व कर्मचारीही सुखरूप असल्याचं समजतंय. इराण युद्ध सुरु झाल्यापासून भारतात दाखल होणारं हे चौथं जहाज असेल. शेनलाँग हे जहाज आधीच मुंबईत पोहोचलंय. तर शिवालिक आज गुजरातमध्ये दाखल होईल, त्यापाठोपाठ नंदा देवी जहाजही उद्या पोहोचेल.

संबंधित व्हिडीओ