Beed Bus Accident| केज-मांजरसुंबा रोडवर भीषण अपघात, जळगाव-लातूर ट्रॅव्हल्स पलटी, 25 प्रवासी जखमी

बीड जिल्ह्यातील केज-मांजरसुंबा रोडवर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झालाय... जळगावहून लातूरकडे जाणारी प्रवासी ट्रॅव्हल्स सांगवी ते पिंपळगाव फाट्यादरम्यान उलटली... अपघातानंतर ट्रॅव्हल्समध्ये आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले... स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासन आणि रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढून केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे... या अपघातात किमान 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, काही प्रवाशांनी चालकाला गाडी सावकाश चालवण्याची सूचना केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार आणि शंभुदेव दराडे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ