मुंबई येथील दादर शिवाजी पार्कावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.१९ मार्चला गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं.दर वर्षीप्रमाणे यंदाही राज ठाकरे "लाव रे तो'' व्हिडिओच्या माध्यातून कुणाचा समाचार घेणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष लागलंय.त्यानिमित्ताने मुंबई येथील दादर शिवाजीपार्कावर जय्यत तयारी करण्यात येतेय. इथं मोठा मंच उभारण्यात आलाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक सभास्थळी येणारेत.