कमर्शियल गॅस सिलेंडर मिळत नसल्याने आता जगण्याच्या शैलीत मोठे बदल घडताना दिसत आहेत. नागपूर विमानतळाच्या कॅन्टीन मध्ये कमर्शिअल सिलेंडरचे स्थान आता विजेच्या इंडक्शन शेगडीने घेतलं आहे... कमर्शियल सिलेंडर संपायला आला म्हणून इंडक्शन शेगडी अनबॉक्स करण्यात आली..आणि थोड्याच वेळात त्यावर चहाला उकळ्या येऊ लागल्या.. त्यामुळे, आता इथे भेट देणाऱ्या शौकीनांना काही पदार्थांना मुकावे लागणार आहे..याच बदलाचा आढावा घेतला, आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी..