Pune|जमीन व्यवहारातून 37 कोटींच्या फसवणुकीचा आरोप,शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरेंसह 10 जणांवर गुन्हा

पुण्यातील महंमदवाडी परिसरातील कोट्यवधींच्या जमीन व्यवहारातून मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सुमारे 37 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे... शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्यासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक विश्वजित झंबर यांच्या फिर्यादीवरून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंमदवाडी परिसरातील अंदाजे २० एकर जमिनीच्या विकासासाठी संबंधितांकडून करार करण्यात आला होता. या व्यवहारातून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सुमारे २२ कोटी रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी आणखी १५ कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यास भाग पाडण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ