बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचा फोटो अहवालातून वगळण्यात आल्याची चर्चा सुरू असून यावर शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.उद्या होणाऱ्या सोमेश्वर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी हा वाद समोर आला आहे. सध्या राष्ट्रवादीच्या पॅनलकडे कारखान्याची सत्ता असतानाही अहवालातून पार्थ पवार यांचा फोटो गायब असल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर भाष्य करताना सतीश काकडे यांनी कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांना पार्थ पवारांचा फोटो घेण्याची लाज वाटत असेल किंवा ते त्यांना आपल्या लेव्हलचे समजत नसतील असा टोला लगावला आहे.
Baramati | Fresh controversy over Someshwar Sugar Factory report; Parth Pawar's photo omitted from the report.