अंबाजोगाईतून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे... लग्नाचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर तब्बल दोन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप उघडकीस आला आहे... पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने विवाहासाठी धर्मांतराची सक्ती करत धमक्या दिल्या...आता याप्रकरणी सलमान अजीज पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे.अंबाजोगाई शहर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे...दरम्यान सदरील महिला आणि आरोपी तीन वर्षापासून सोबत राहत होते.फिर्यादी महिला विवाहित असून तिला चार आपत्य असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.