सोलापुरात ITच्या मुलांना बोगस प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आलंय.AIच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र दिलं जायचं.. याप्रकरणी कंपनीवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली.याप्रकरणी कंपनीचा सूत्रधार अशपाक अत्तारसह आठ जणांवर गुन्हा दाखल झालाय.अत्तार हा सासऱ्याच्या घराला ऑफिस बनवून रिमोट शेअरद्वारे रॅकेट चालवत होता.त्याने एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करत लाखो रुपये उकळल्याचा अंदाज आहे.सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू आहे..