द केरळ स्टोरी हा चित्रपट आला.त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती.त्यावेळी खरंच असं होतं का, असं धर्मांतर केलं जातं का, याबद्दल विविध चर्चाही सुरू झाल्या होत्या... हा चित्रपट प्रदर्शित झाला २०२३ मध्ये पण त्याआधीपासून म्हणजे २०२२ पासून महाराष्ट्रातच हा धर्मांतराचा भयानक खेळ सुरू होता.मंदिरांची नगरी असलेल्या नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत जबरदस्तीनं हिंदू मुलींचं धर्मांतर केलं जात होतं.आणि याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती.मात्र हा सगळा प्रकार बाहेर आला आणि अख्खा महाराष्ट्र हादरला... आणि म्हणूनच आता सगळ्यांना आठवण झालीय ती महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाची.सध्या नाशिक टीसीएस प्रकरणात ७ आरोपींना अटक झालीय.हे विधेयक कायद्यामध्ये बदललं तर आरोपींची खैर नाही.काय आहे हे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक... काय झालंय त्या विधेयकाचं.... पाहुया एक सविस्तर रिपोर्ट