मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे CSMT वर अपघात टळला, Badlapur Train प्लॅटफॉर्म 4 ऐवजी पाचवर आल्याने गोंधळ

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं मोठा रेल्वे अपघात टळल्याची घटना समोर आलीय.. बदलापूरहून येणारी फास्ट लोकल नियोजित 4 नंबर प्लॅटफॉर्मऐवजी अचानक 5 नंबर प्लॅटफॉर्मकडे वळू लागली... पण त्या प्लॅटफॉर्मवर आधीच एक लोकल उभी होती.. समोरच दुसरी लोकल उभी असल्याचे लक्षात येताच येणाऱ्या लोकलच्या मोटरमनने प्रसंगावधान राखत तात्काळ ब्रेक लावला.. दोन्ही गाड्यांमध्ये केवळ एका डब्याएवढे अंतर शिल्लक राहिलं होतं.. मोटरमनच्या तत्परतेमुळे ही मोठी दुर्घटना टळली...दरम्यान, याची आता चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली.

संबंधित व्हिडीओ