जुनी दुचाकी खरेदीसाठी धाराशिव जिल्ह्यातून बीडच्या वाणगाव येथे आलेल्या दोन मित्रांना चोरीच्या आरोपावरून गंभीर मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर मारहाणीनंतर त्यांना ट्रॅक्टरला बांधून ठेवण्यात आले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. घटना नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाणगाव येथील आहे. यातील मृत तरुण हा धाराशिव जिल्ह्यातील असून संभाजी सारूक असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नेकनुर पोलिसात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असुन आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. एका आरोपीचा शोध सुरू असुन पुढील तपास नेकनुर पोलीस करत आहेत.