राजकीय गोटातून मोठी बातमी.... एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा फिस्कटल्यावर आता शरद पवारांचा पक्ष एनडीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा जोर धरू लागलीय. शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भाजपच्या एका केंद्रीय नेत्यासोबत बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीसंदर्भात सूत्रांनी एनडीटीव्हीला माहिती दिलीय. फेररचना विधेयकावर पाठिंबा, केंद्रातील संभाव्य राजकीय भूमिका, तसेच महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांबाबत विविध स्तरांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभा मतदारसंघांच्या फेररचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि एनडीए यांच्यातील जवळीक वाढलीय. दरम्यान सुप्रिया सुळे या एनडीएमध्ये येऊन मंत्री झाल्या तर आम्हाला आनंदच होईल असं खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलंय.