पालघरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाच्या मैदानातच महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांच्यात भर कार्यक्रमात व्यासपीठावरच शाब्दिक चकमक झाल्याने राजकीय वातावरण तापलं. पालकमंत्री गणेश नाईक यांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला. यावेळी व्यासपीठावर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी मनोज रानडे, वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. १९ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात खेळाडूंच्या स्पर्धांऐवजी महायुतीच्या नेत्यांमधील राजकीय सामना चर्चेचा विषय ठरला आहे.