Beed| माजलगाव धरण 56 टक्क्यांवर, आवक कायम राहिल्यास रविवारपर्यंत 80 टक्के भरण्याची शक्यता

गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. आज मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत धरण ५६ टक्क्यांवर भरले असून सध्या दहा हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे. आवक याच वेगाने कायम राहिल्यास रविवार पर्यंत धरण ८० टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. धरणातील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे बीड आणि माजलगावसह २२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे.

संबंधित व्हिडीओ