Beed | बीडच्या राजकारणातून मोठी बातमी, आमदार प्रकाश सोळंकेंची निवृत्तीची घोषणा | NDTV मराठी

बीडच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी एका विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी थेट आपल्या राजकीय वारसदाराची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी स्वतः उमेदवार म्हणून तुमच्यासमोर येणार नाही, तर माझा पुतण्या जयसिंग सोळंके यांना आमच्याकडून उमेदवारी दिली जाईल, असं मोठं विधान प्रकाश सोळंके यांनी केलंय. त्यांच्या या घोषणेमुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सोळंके यांनी निवडणुकीच्या राजकारणातून माघार घेण्याचे संकेत दिले असून, आता माजलगावच्या राजकारणात जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वाची नवी इनिंग सुरू होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित व्हिडीओ