Beed Rain| तब्बल 42 दिवसांनंतर आष्टीत पावसाचे आगमन, रब्बी हंगामासाठी आणखी समाधानकारक पावसाची गरज

बीड जिल्ह्यातील आष्टी परिसरात तब्बल 42 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असली तरी या पावसाचा खरीप पिकांना फारसा फायदा होणार नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दीर्घकाळाच्या पावसाअभावी शेतातील पिके करपू लागली होती, तर जनावरे आणि पशुपक्ष्यांनाही पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत झालेल्या या पावसामुळे वातावरणातील उष्णता आणि काहिली काही प्रमाणात कमी झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी अद्याप कायम असून रब्बी हंगामासाठी आणि जलसाठे वाढण्यासाठी अजूनही चांगल्या पावसाची गरज असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाच्या या हजेरीने दिलासा मिळाला असला तरी बळीराजाची नजर अजूनही आकाशाकडेच लागून आहे. Beed Rain | Rain arrives in Ashti after a long gap of 42 days; more satisfactory rainfall needed for the Rabi season.

संबंधित व्हिडीओ