निसर्ग जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो, पण जेव्हा कोपतो तेव्हा माणसाची अवस्था कशी बिकट होते, याचं जिवंत उदाहरण बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.. गेल्या वर्षी याच काळात अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणारी सिंधफणा नदी आता वर्षभरातच पूर्णपणे कोरडीठाक पडलीय.. निसर्गाच्या या बदलत्या आणि रौद्र रूपामुळे स्थानिक शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय.. गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे सिंधफणा नदीला भीषण पूर आला होता.. त्यावेळी नदीकाठच्या नांदूर हवेली या गावाला पावसाच्या आणि पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढा घातला होता.. शेत, रस्ते आणि गावे पाण्याखाली गेली होती.. मात्र वर्षभराच्या आतच निसर्गाने दुसरे टोक गाठलंय. ज्या सिंधफणा नदीत तुडुंब पाणी वाहत होते, त्याच नदीचे पात्र आता पाण्यासाठी तडफडत असून पूर्णपणे वाळून गेलंय.. नांदूर हवेली परिसरातील सिंधफणा नदीच्या पात्रात आता पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहिलेला नाही. वाळलेल्या नदीपात्राचे हे दृश्य पाहणाऱ्याच्या काळजाचे पाणी करत आहे.
Beed | Sindphana River's drastic transformation: the river has gone completely dry within a year; not a single drop of water remains in the riverbed.