Beed News | चक्क दुष्काळात विहिरीला तुडूंब पाणी, थेट हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी l NDTV Marathi

मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट असताना बीडच्या भगवानगडाच्या पायथ्याशी मात्र निसर्गाचं गूढ रुप पाहायला मिळालंय. परिसरातील विहिरी कोरड्या पडलेल्या असताना घोगस-पारगावच्या शिवारातील एक विहीर अचानक तुडुंब भरली. भगवान बाबांच्या जयंतीच्या दिवशी या विहिरीला पाणी आल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये श्रद्धेची भावना निर्माण झाली आहे. या निमित्ताने हजारो भाविक गडावर दाखल झाले आणि दर्शनानंतर या विहिरीचं पाणी पाहण्यासाठीही गर्दी केली. दरम्यान, भगवानगडाचे भक्त बाळासाहेब सानप यांच्या पुढाकारातून या विहिरीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दुष्काळात पाण्याने भरलेली ही विहीर आणि त्यावर झालेली पुष्पवृष्टी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. Beed News | A well brimming with water amidst a drought; flowers showered directly from a helicopter.

संबंधित व्हिडीओ