धाराशिवमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यात गोंधळ झाला. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी शेतकऱ्यांसोबत फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते. मात्र शेतकऱ्यांना दोरखंडाने अडवलं असा आरोप कैलास पाटलांनी केलाय.. यामुळे शेतकऱ्यांनी मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केलीय. गोंधळानंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंच्या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रताप सरनाईकांनी कैलास पाटलांना राजकारण करू नका असाही सल्ला दिलाय.
Dharashiv | Chaos during Chief Minister's visit; farmers blocked with ropes, alleges Kailas Patil.