धुळे जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.. पावसाअभावी शेतातील पिकांची अवस्था बिकट झाली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.शिंदखेडा तालुक्यात कापूस, मका यासह विविध पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथील शेतकऱ्यांनी अखेर आपल्या कपाशीच्या शेतात जनावरे सोडून संपूर्ण पीक त्यांना चरण्यासाठी मोकळं केलंय.उत्पादनच मिळत नसल्याने जनावरांच्या चाऱ्याची सोय तरी होईल या उद्देशाने शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे.
Dhule Drought | Drought situation critical in Dhule; farmer in Varzadi destroys cotton crop.