शेतकऱ्यांच्या बांधावर Dattatray Bharne यांच्याकडून नुकसानीची पाहणी,कृषिमंत्र्यांनी काय दिलं आश्वासन?

बारामती तालुक्यातल्या मोरगाव परिसरातही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांची पिके करपली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाच्या माध्यमातून शक्य ती मदत देण्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी दिल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कृषिमंत्र्यांनी या शेतकऱ्यांना नेमकं काय आश्वासन दिलं या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.... Dattatray Bharne inspects crop damage right at the farmers' fields; what assurance did the Agriculture Minister give?

संबंधित व्हिडीओ