भिवंडीमध्ये प्रेमविवाहाचा एक धक्कादायक शेवट समोर आला आहे. येथील एका २२ वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामवर रिल्स बनवण्याच्या वादातून पत्नीची हत्या केली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली. आरोपीने पत्नीचे शिर धडावेगळे करून खाडीमध्ये फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.