एकीकडे भारत अमेरिका संबंध सुधारण्याविषयी ट्रम्प संकेत देत असतानाच त्यांचे दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलाबरोबरचे संबंध मात्र प्रचंड ताणले गेलेत... अमेरिका ही जगातली महासत्ता... त्यातच उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील देशांसाठी बिग ब्रदरच्या भुमिकेत अमेरिकेनं अनेकदा या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घातलंय. असंच काहीसं व्हेनेझुएलाच्या बाबतीतही घडलं.. व्हेनेझुएलाचे सध्याचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या सत्तेला अमेरिकेनं विरोध दर्शवलाय. आणि विरोधी पक्षनेते खुआन गोईदो यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता दिली... त्यामुळे मादुरो सध्या प्रचंड संतापलेत. त्यांनी अमेरिकेच्या वसाहतवादाला जुमानणार नाही असं जाहीर करत दंड थोपटलेत. त्यातच अलिकडे अमेरिकन युद्धनौकांवरून व्हेनेझुएलाच्या विमानांनी उड्डाण केलं आणि आगीत तेल पडलंय. काय नेमकं घडतंय अमेरिकन खंडात, हा संघर्ष आणखी किती पुढे गेलाय. पाहूया एक रिपोर्ट....