2025 वर्षातील शेवटचे खग्रास चंद्रग्रहण उद्या रात्री होणार असून, या काळात आकाशात 'ब्लड मून' किंवा 'रेड मून' दिसेल. रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल आणि रात्री 1 वाजून 27 मिनिटांनी ते संपेल. खगोल अभ्यासकांसह सर्वसामान्यांमध्येही या घटनेची मोठी उत्सुकता आहे.