मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सूत्रांनुसार जरांगे पाटील आझाद मैदान पोलीस स्टेशनला जाणार नाहीत. मात्र, त्यांचे वकील आणि मुंबईतील आंदोलक वीरेंद्र पवार, गंगाधर काळकुटे चौकशीसाठी उपस्थित राहतील.