कल्याण-डोंबिवली रनर्स आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित 'डोंबिवली फ्रेंडशिप रन २०२५' मध्ये उत्साह संचारला होता. गश्मीर महाजनी आणि विश्वविजेती बॉक्सर साक्षी चौधरी यांनी धावपटूंना प्रोत्साहन दिले. साक्षीने "आपल्या गोल्डपर्यंत धावा" असा संदेश दिला.