मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि मतदार याद्यांमधील त्रुटी यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार आहे. मनसेचे सरचिटणीस, शहराध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत