उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना (उबाठा) उपनेते बाळ माने यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'ज्या लोकांना जनतेनं चार वेळा डांबर फासलंय, त्यांच्यावर मला बोलायचे नाही,' असे सामंत म्हणाले. ते म्हणाले की काही लोक संपलेले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत.