जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटतं नाही, काही तर गडबड आहे ? अशा खालच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला,यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे.