मुंबई महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना युद्ध सुरु झाल्यानं छत्र्या देऊ शकलो नाही- बीएमसी प्रशासनाचं अजब स्पष्टीकरण.आंतरराष्ट्रीय युद्धाचा आणि मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना द्यायच्या छत्र्यांचा काय संबंध?? विरोधकांचा सवाल.मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळा संपायला आला तरी छत्र्या मिळाल्या नाहीत.यावर शिक्षण समिती बैठकीत प्रश्न प्रश्न विचारण्यात आले. मात्र, छत्र्यांसोबतच मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊन ४ महिने होत आले तरी शैक्षणिक साहित्याच्या २७ वस्तु मिळालेल्या नाहीत.