Jalna| शाळेत शिक्षक नसल्याने संतप्त पालकांनी शाळेला ठोकलं कुलूप, 17 सप्टेंबरला तीव्र आंदोलनाचा इशारा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या गैरहजेरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पहिली ते पाचव्या इयता पर्यंत असलेल्या या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती असताना गेल्या चार वर्षांपासून एक शिक्षक रजेवर असल्याने दुसरा शिक्षक शिक्षकही शासकीय कामानिमित्त वारंवार बाहेर राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी एका खिचडी बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर आल्याने शिक्षण विभाच्या या परिस्थितीला कंटाळलेल्या संतप्त पालकांनी शाळेत जाऊन थेट शाळेलाच कुलूप ठोकत शाळा बंद केलीय. जोपर्यंत शाळेत पुरेसे शिक्षक उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत शाळा सुरू होऊ देणार नाही, असा इशाराच पालकांनी जिल्हा शिक्षण विभागाला देत वारंवार जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अद्याप ठोस कारवाई १७ सप्टेंबर ला तीव्र आंदोलन करत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात वर्ग भरवण्याचा इशाराही पालकांनी शिक्षण विभागाला दिलाय.त्यामुळे जालन्यातील शिक्षण विभागाचा सावळा गोधळ पुन्हा एकदा चोव्हट्यावर आलाय...

संबंधित व्हिडीओ