Budget 2026 | बजेटमधून शेतीसाठी काय? शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा? PM किसान सन्मान योजनेची रक्कम वाढणार?

यंदाच्या बजेटमधून काय मिळणार याकडे शेतकऱ्यांचंही लक्ष लागलंय. पीएस किसान सन्मान योजनेची रक्कम वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2019 मध्ये ही योजना सुरु झाली.. शेतकऱ्यांना सध्या एका वर्षात 6 हजार रुपये मिळतात. डिसेंबर 2024 मध्ये संसदीय स्थायी समितीने ही रक्कम दुप्पट करुन 12 हजार रुपये वार्षिक करण्याची शिफारस केली होती. तर नोव्हेंबर 2025 मध्ये बिहार सरकारने शेतकऱ्यांना 3 हजार रुपये अतिरिक्त देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बिहारमधल्या शेतकऱ्यांना एकूण 9 हजार रुपये मिळतील. तेव्हा केंद्र सरकार संपूर्ण देशासाठी हीच रक्कम लागू करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. देशातल्या सुमारे 11 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा फायदा मिळेल. 3 हजार रुपयांच्या अतिरिक्त रकमेमुळे शेतकरी आपल्या शेतीच्या लहान-सहान गरजा पूर्ण करू शकतील.

संबंधित व्हिडीओ