सर्वसामान्यांना बजेटमधून इन्कम टॅक्सव्यतिरिक्त नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे NPS मध्येही सवलतीची अपेक्षा आहे. सरकारने याआधीच खासगी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी 80 टक्के निधी काढण्याची परवानगी दिली आहे. तर उर्वरित 20 टक्के निधी अॅन्युटीसाठी राखीव ठेवण्यात येतो. यंदाच्या बजेटमध्ये NPSची सवलत ही नवीन कर प्रणालीत समाविष्ठ करावी. तसंच 80 टक्के रक्कम काढताना शून्य कर लागू करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. अर्थसंकल्पातून विमा क्षेत्रालाही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारने याआधीच विमा क्षेत्राला GST शून्य श्रेणीत आणले आहे आणि 100 टक्के परदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे.