यंदाच्या अर्थसंकल्प हा रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी देऊ शकतो. बजेटमध्ये अंदाजे 300 ते 500 नवीन गाड्या सुरु करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. यात वंदे भारत तसंच अमृत भारतसारख्या गाड्यांना समावेश आहे. रेल्वे अपघातांना आळा घालण्यासाठी कवच प्रणालीसाठी विक्रमी निधी अपेक्षित आहे. सरकारला नवीन गाड्या सुरु करून 2030 पर्यंत वेटिंग लिस्ट संपवायची आहे. त्यासाठी रेल्वे गाड्या वाढवण्यासोबतच ट्रॅकचाही विस्तार करावा लागेल. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या सुमारे 2 कोटी लोकांना त्याचा फायदा होईल. रेल्वेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.गेल्या बजेटमध्ये रेल्वेसाठी 2.65 लाख कोटींचा निधी देण्यात आला होता. यंदाही त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.