Union Budget 2026| आयुष्मान भारत योजनेचा विस्तार होणार?60 वर्षांवरील ज्येष्ठांना योजनेचा लाभ मिळणार?

मोदी सरकार यंदाच्या बजेटमध्ये ज्येष्ठांना दिलासा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आयुष्मान भारत योजनेचा सरकार विस्तार करु शकते. सध्या 70 वर्षांवरच्या ज्येष्ठांना याचा लाभ मिळतोय. ती वयोमर्यादा कमी करुन ती 60 वर आणली जाऊ शकते. त्यासोबतच वार्षिक 5 लाखांच्या मोफत उपचाराचीही मर्यादा वाढवली जाऊ शकते. ज्यामुळे कॅन्सर तसंच हृदय शस्त्रक्रियेसारख्या गंभीर आजारांचा खर्च भागवता येऊ शकतो. एका अहवालानुसार भारतात 60 वर्षांवरच्या 82 टक्के वृद्धांकडे कोणताही आरोग्य विमा नाही. त्यामुळे गंभीर आजारांसाठी त्यांना आपली सेव्हिंग मोडावी लागते. जर उपचारासाठी वयोमर्यादा 60 वर्ष झाल्यास कोट्यवधी ज्येष्ठांना याचा दिलासा मिळेल. गंभीर आजारांचा खर्च कव्हर होऊ शकतो...

संबंधित व्हिडीओ