Union Budget 2026 | Income Tax मध्ये सवलत मिळणार? जुनी कर प्रणाली रद्द होणार? मोठी घोषणा होणार?

यंदाच्या बजेटमध्ये सर्वांचं लक्ष लागलंय ते इन्कम टॅक्सच्या सवलतींकडे.. तसंच जुनी कर प्रणाली रद्द होणार का याकडेही प्रत्येकाची नजर आहे. नोकरदार वर्गासाठी 13 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होऊ शकतं असा अंदाज आहे. गेल्या वर्षी सरकारने 12 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर करमाफी दिली होती. तसंच पगारदार कर्मचाऱ्यांना 75 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन देण्यात आली होती. ही करमाफी 12 लाखांवरून 14 लाखांपर्यंत वाढवावी अशी करदात्यांची अपेक्षा आहे. सध्या देशात जुनी आणि नवी कर प्रणाली आहे. जुन्या कर प्रणालीत अनेक करदाते आयटीआर फाइल करतात. त्यामध्ये एचआरए, हाऊस रेंट अलाउंटमध्ये सूट मिळते. याचसोबत होम लोनवरील व्याजात 2 लाखांपर्यंतची सूट मिळते. याचसोबत सेक्शन 80C अंतर्गत दीड लाखांची कर सूट मिळते. दरम्यान, या सुविधा नवीन कर प्रणालीत दिल्या जात नाही. जर करदात्याने स्वतः हून नवीन कर प्रणाली निवडली नाही तरीही डिफॉल्ट नवी कर प्रणाली लागू व्हायची. यामुळेच जुनी कर प्रणाली रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित व्हिडीओ